सातारा प्रतिनिधी । ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या ग्रामसेवकांना अन्यायकारक व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने सातारा जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी उद्या बुधवार (दि. १८) रोजीपासून असहकार आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींची कामे ठप्प होणार आहेत.
दरम्यान, उद्यापासून करण्यात येणाऱ्या आंदोलन काळात सर्व ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत गावांमध्ये उपस्थित राहणार आहेत. मात्र, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आढावा सभांना ग्रामसेवक उपस्थित राहणार नाहीत. याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांना निवेदन दिले आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे वेळेचे बंधन न पाळता जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनाचे आदेश अंतिम मानून कामकाज केले आहे. मात्र, ग्रामसेवकांना नोटीस किंवा कारवाई करण्याचा नेमका उद्देश काय असू शकतो.
१७५ ग्रामपंचायतीची तपासणी केल्यावर ग्रामपंचायतीचे दार अपूर्ण ठेवून १०० टक्के कामकाज झालेच नाही, सर्वांचेच अपूर्ण दसर म्हणून नोटीस देणे कितपत योग्य वाटत आहे. घरकुल उद्दिष्ट पूर्तता व कामे पूर्ण करणे, १५ व्या वित्त आयोग निधी खर्चाबाबत बांबू लागवड व मनरेगा योजनेची कामे करणे, ग्रामसेवकांच्या मूलभूत हक्कांच्या व सेवाविषयक बाबींकडे दुर्लक्ष होत आहे.