कराड प्रतिनिधी | सध्या गणपती उत्सव धुमधडाक्यात मोठ्या उत्साहात चालू आहे. गणेशोत्सव साजरा करताना जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील किरपे ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांनी मूर्ती विसर्जन करताना नदीत निर्माल्य टाकू नये, ते शेतात अथवा खत निर्मितीसाठी वापरावे. असे उपाय करत नदी प्रदूषण न करण्याचे महत्वाचे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
किरपे गाव हे कोयना नदीकाठी वसले आहे. गावालगत असलेल्या कोयना नदीत प्रदूषण न होण्यासाठी गावातील ग्रामस्थांकडून काळजी घेतली जाते. यावर्षी शासनाकडून नदीकाठी असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना नदी प्रदूषण न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तशा स्वरूपाच्या सूचना ग्रामपंचायतींना देखील केल्या आहे. त्यानुसार किरपे ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना गणेश मूर्तीचे विसर्जन करताना निर्माल्य नदीमध्ये टाकू नये, कोणत्याही प्रकारचे नदी प्रदूषण करू नये तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
किरपेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवसाठी ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांना केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन pic.twitter.com/SgJpCF152X
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 23, 2023
किरपे ग्रामपंचायतीकडून गावातील ग्रामस्थासाठी अनेक शासकीय योजना, उपक्रम राबविला जातात. दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीकडून गावात असलेली सार्वजनिक मंडळे, घरगुती गणपती बसवलेल्या नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आवाहन करण्यात आले आहे.