फलटण नगरपालिका प्रभागरचनेत बदल होणार!; शासन निर्णय प्रकाशित, 27 नगरसेवकांचे होणार नवे बोर्ड

0
301
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण नगरपालिकेतील प्रभागरचनेत महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. आता प्रभाग द्विसदस्यीय रचनेत बदलणार आहेत, तर नगरसेवकांची संख्या २७ राहणार आहे. दि. २५ जानेवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल दि. १० जून रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.

फलटण नगरपालिकेतील प्रभागरचना द्विसदस्यीय करण्यात येणार असून, नगरसेवकांची एकूण संख्या २७ राहणार आहे. हे बदल दि. २५ जानेवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आले आहेत. प्रभाग रचना हि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्त करणार आहेत. नगरपालिकेच्या प्रभागरचना तयार करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यांनी नव्याने प्रभागरचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्त करणार आहेत.

फलटण नगरपालिकेतील हे बदल अधिक प्रभावी आणि स्पष्ट प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या नवीन प्रभागरचनेमुळे माजी व भावी नगरसेवकांचे टेन्शन वाढले आहे. यामध्ये नक्की आपला प्रभाग कसा होणार ? याकडे आता माजी व भावी नगरसेवक लक्ष लावून बसले आहेत. फलटण नगरपालिकेतील हे बदल नागरिकांच्या सेवेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. नवीन प्रभागरचना आणि नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आल्याने प्रशासनामध्ये पारदर्शकता वाढणार आहे आणि नागरिकांना अधिक प्रभावीपणे प्रतिनिधित्व मिळेल.