कराड प्रतिनिधी । रेल्वे प्रशासनाकडून ‘बंगळुरू – भगत की कोठी’ या उन्हाळी विशेष एक्स्प्रेससह सुरु करण्यात आलेल्या सर्व विशेष रेल्वे गाडयांना सांगली व कराड, किर्लोस्करवाडी या स्थानकावर थांबा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त करण्यात आला. पुणे विभागातील सांगली आणि कराड, किर्लोस्करवाडी या जास्त उत्पन्न देणाऱ्या दोन स्थानकांवर थांबा दिला गेलेला नसल्याने या स्थानकावर सर्व रेल्वे गाडयांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी केली असल्याची माहिती ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
रेलवे प्रशासनाकडून रेल्वे गाड्यासंदर्भात घेतल्या केल्या जात असलेल्या अन्यायकारक भूमिकेबद्दल गोपाल तिवारी यांनी आज ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सांगली आणि कराड, किर्लोस्करवाडी स्थानकाच्या तुलनेत कमी उत्पन्नाच्या २५ स्थानकांवर नव्याने सुरु झालेल्या तसेच उन्हाळी, हिवाळी व काही विशेष गाड्या थांबतात. मात्र, या स्थानकावर गाड्या थांबत नाहीत. यामुळे सांगली आणि कराड, किर्लोस्करवाडी येथील रेल्वेने प्रवास करणाऱ्या जनतेवर हा अन्याय होत आहे.
बंगळुरू-भगत की कोठी एक्स्प्रेस (क्र. ०६५८७/०६५८८) या वातानुकूलित गाडीसह प्रत्य्रेक गाड्यांना सांगली व कराड, थांबा नाकारण्यात आला आहे. या गाडीच्या मार्गावरील ३७ स्थानकांवर थांबा मंजूर आहे, मात्र, पुणे विभागातील सांगली आणि कराड या जास्त उत्पन्न देणाऱ्या दोन स्थानकांवर थांबा दिला गेला नाही. राजस्थान एसी ट्रेन क्रमांक १९६६८ साठी सांगली थांब्याचे प्रति फेरी उत्पन्न १ लाख रुपये आहे. राणी चेनम्मा एक्स्प्रेसचे सांगली स्टेशनचे दैनंदिन उत्पन्न १.२ लाख रुपये आहे.
सांगली व कराड स्थानकावर थांबा द्यावा : गोपाल तिवारी
सांगली स्थानकातील मुंबई गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न ८० हजार रुपये प्रति फेरी इतके आहे. कराड स्थानकाचे विविध गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न सरासरी सुमारे ५० हजार रुपये आहे. हे उत्पन्न रेल्वेच्या लेखी खूप चांगले आहे. त्यामुळे या गाडीला सांगली व कराड स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी सल्लागार समितीच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.