मुसळधार पावसामुळे येरळा धरण लागले भरू; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांची पिकं जगविण्यासाठी वरदान लाभलेल्या येरळा धरणात पाणी नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, आता मुसळधार पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धरण परिसर झोडपून काढला आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिला. यामुळे तळ गाठलेल्या येरळा धरणात पाणी खळखळ वाहू लागले आहे.

येरळा धरणात पंचेचाळीस टक्के पाणीसाठा झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने ओढे, नाले खळखळ वाहू लागल्याने, तसेच पाझर तलाव तुडुंब भरल्याने येरळामाई धरणासह आजूबाजूची शेतशिवारं चांगलीच बहरली आहेत. उन्हाळ्यात पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस शिल्लक राहावा यासाठी प्रशासनाने धरणात शेतकऱ्यांची वीज, पाणी कनेक्शन, तोडण्याचा धडाका सुरू केला होता. वीस जणांचे साहित्य जप्त केले होते.

त्यामुळे आपली पिकं जगवण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र मागच्या तीन महिन्यांत ‘इकडे आड, तिकडे विहीर’, अशी स्थिती झाली होती. काही शेतकरी साहित्य जप्त होण्याच्या व तोडण्याच्या भीतीने स्वतः पाण्यात उतरून जेसीबीच्या साह्याने आपल्या मोटारी, पाईप, केबल काढून घर घेऊन जात होते. चोरून रोज असाच पाण्याचा उपसा झाला तर पंधर दिवसांत धरणात खडखडाट होईल व पाणी संपेल, याची धास्ती प्रशासनाल चांगलीच लागली होती. या पाणीटंचाई समस्येमुळे उन्हाळी पिकांवर शेतकऱ्यांना पाणी सोडावं लागलं होते.

जूनच्या पाहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने दिलासा दिल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या लोकांना व शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिकडे-तिकडे खेड्यापाड्यात टँकरर्च समस्या भेडसावत होती. काह ठिकाणी टँकर सुरू होते. तर काह ठिकाणी बऱ्यापैकी पाणी होते. त्यामुळे भागात अशी चर्चा होती की ‘आत्त मान्सून आला आणि पाऊस गेला अशी वेळ येऊन ठेपलेल्या येरळ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन ते चार मुसळधार पावसाने पाणी-पार्ण केल्याने धरणात चाळीस ते पंचेचाळीस, पाणीसाठा झाला आहे.