सातारा बाजार समितीत झाली कोटीची उलाढाल; कांदे-बटाटेसह झाली भाज्यांची आवक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाने बाजार समितीच्या धोरणात बदल करुन कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ काल सोमवारी जिल्ह्यातील मुख्य बाजार समित्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते ते आज मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू केले. त्यामुळे आज दिवसभरात एक कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. तसेच सातारा बाजार समितीत तर कांदा आणि बटाट्याची मोठी आवक झाल्याचे दिसून आले. मंगळवारी ४६७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाल्याचे पहायला मिळाले.

जिल्ह्यात सातारा, फलटण, कराड, वाई या बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. तसेच भुसार मालाचीही आवक होते. तर खंडाळा तालुक्यातील लोणंद बाजार समिती कांद्यासाठी प्रसिध्द आहे. याठिकाणी आठवड्यातून दोन दिवस कांद्याची मोठी आवक होते. पण, केंद्र शासनाने बाजार समितीच्या धाेरणात काही बदल केला आहे. यामुळे निवडणूक न होता बाजार समितीवर कायम प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला. याच्या निषेधार्थ सोमवारी संपूर्ण राज्यातील बाजार समित्या एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या.

या बंदमध्ये सातारा जिल्ह्यातील समित्यांनाही सहभाग घेतला. यामुळे बाजार समित्यांकडे शेतकरी फिरकलेच नाहीत. तसेच आवारात शुकशुकाटच दिसून आला. तर बंदच्या एका दिवसातच जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीतील सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल थांबली. यामध्ये सातारा बाजार समितीतील सुमारे ५० लाखांच्या उलाढालवर परिणाम झाला होता. पण, मंगळवारी पुन्हा बाजार समित्या सुरू झाल्या. सातारा, कराड येथील बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत सुरू झाले.

सातारा बाजार समितीत तर मंगळवारी ४६७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तसेच कांदा २७९ आणि बटाटा ३५७, लसूण ३६ आणि आलेचीही १७ क्विंटलची आवक राहिली. त्याचबरोबर मेथीच्या दीड हजार तर कोथिंबीरच्या तीन हजार पेंड्यांची आवक झाली. तर पपई, पेरु, खरबूज, द्राक्षे, चिकू आदी फळांचीही ५९ क्विंटलची आवक झाली. सातारा बाजार समितीत सध्या वांगी, फ्लाॅवर, दोडका, कारली, हिरवी मिरची, भेंडी, पावटा आणि गवारला चांगला दर मिळत असल्याचे दिसून आले.