सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात शेवटच्या दिवशी उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग सुरु असताना सायंकाळी प्रशासनाने आनेवाडी टोल नाक्यावर तब्बल 34 लाख रुपयांचे ताब्यात घेतल्याची घटना घडली. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी टोलनाक्यावर तैनात केलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती बंदोबस्त तैनात आहे. दोनच दिवसांपूर्वी सुमारे साडेसात कोटी रुपयांचा सोन आणि चांदी तासवडे टोल नाका येथे जप्त करण्यात आली होते. अशाच प्रकारची कारवाई आनेवाडी टोलनाक्यावर निवडणुकीसाठी नियुक्त पथकाकडून करण्यात आली आहे. सायंकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास 34 लाखांचं सोने तहसीलदार नागेश गायकवाड यांच्या पथकाकडून जप्त करण्यात आलेले आहे.
ही कारवाई केल्यानंतर ताब्यात घेतलेला ऐवज मोजण्याचे काम पथकाकडून सुरु होते. हे सोन नेमकं कुठून कुठे जात होते याची तपासणी पोलीस व महसूल विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात सोने सापडत आहे. या सोन्याचा वापर नेमका निवडणुकीसाठी होत आहे का? याची तपासणी ही पथकाकडून केली जात आहे.