सातारा प्रतिनिधी । घरफोडी करून दागिन्यांची चोरी केलेल्या इसमांस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केले. तसेच इसमांकडून ५३ हजार रुपये किमतीची एक सोन्याची चेन, चादीची चेन, पायातील चांदीचे पैंजण असे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये १) अशोक शिंदे (वय १९, रा. डवर वस्ती, कोरेगाव), दुसरा विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी सातारा जिल्हयातील मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथके तयार करुन त्यांना मालमता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. दि.०८/०६/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय गोपनिय माहिती प्राप्त झाली की, एक इसम सातारा शहरातील करंजे नाका या ठिकाणी घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिणे विक्री करण्याकरीता येणार आहे.
त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना तपास पथकासह प्राप्त माहितीच्या ठिकाणी जाऊन एका इसमास ताब्यात घेतले. आणि संबधीतावर पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकाने सातारा शहरातील करंजेनाका म्हसवेरोड या परिसरामध्ये सापळा लावून ताब्यात घेतलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५३ हजार रुपये किमतीची एक सोन्याची चेन, चादीची चेन, पायातील चांदीचे पेजन मिळून आले. त्याचेकडे मिळून आलेल्या सोन्या चांदीच्या दागिण्याबाबत त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने सदरचे दागिने कोरेगाव शहरातील श्रीनावनगर मार्केट यार्डचे पाठीमागे असलेल्या एका घरातून चोरी केले असल्याचे कबूल केले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाणे गु.र.नं.२४२/२०२४ भादविक ४१४, ३८० हा घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, विश्वनाथ संकपाळ, अनिष पारगे, संतोष संपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेचल, लेलेश फडतरे, प्रविण फडतरे, गणेश कापरे, अरुण पाटील, अमित माने, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, मयूर देशमुख, प्रविण पवार, शिवानी गुरव यांनी सदरची कामगिरी केली.