सांगली MIDC मधील केमिकल कंपनीत वायू गळती; दोन महिलांचा मृत्यू, जखमींना कराडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आगीमध्ये 9 लोक अत्यावस्थ झाले होते, यातील 7 जणांना रात्री कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन महिलांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलांपैकी एक महिला सातारा जिल्ह्यातील मसूर येथील आहे. तर अद्यापही कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 5 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील म्यानमार केमिकल कंपनी शाळगाव एमआयडीसी मध्ये वायू गळती झाल्याने 9 लोक अत्यवस्थ झाले होते. या सर्वांना गुरुवारी रात्रीच्या सुमारास कराड येथील सह्याद्री व श्री. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुचिता उथळे (वय ५०) येतगाव, तर नीलम रेठरेकर (वय २६, रा. मसूर, जिल्हा सातारा) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अन्य पाच रुग्णांवरती आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

म्यानमार केमिकल कंपनी शाळगाव एमआयडीसी मध्ये वायू गळती झाल्याने 9 लोक अत्यवस्थ झाले होते. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शेलार साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे व माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देत सर्व टेक्निकल बाबीवर चर्चा केली. दरम्यान, ही वायुगळती नेमकी कशामुळे झाली याबाबत सविस्तर माहिती समजू शकली नाही.

शाळगाव एमआयडीसीला आग, दोघांचा मृत्यू

म्यानमार केमिकल कंपनीत झालेल्या वायू गळतीत दोन महिलांनी जीव गमावला. सुचिता उथळे (वय 50) राहणार येतगाव, जिल्हा सांगली, तर नीलम रेठरेकर (वय 26 रा. मसूर, जिल्हा सातारा) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावं आहेत.