कराड प्रतिनिधी | कराड शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळांना ‘गणराया अवॉर्ड’चे गुरुवारी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत थाटात वितरण करण्यात आले. शहर हद्दीत शुक्रवार पेठेतील ‘जय जवान जय किसान’ने तर ग्रामीणं पोलिस ठाणे हद्दीत कापीलच्या श्रीरामनगर येथील बाल क्रीडा गणेश मंडळाने प्रथम कमांक पटकावला.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, महेंद्र जगताप, सहायक निरीक्षक अमित बाबर, सहायक निरीक्षक संदीप सूर्यवंशी, सहायक निरीक्षक भोरे यांच्यासह परीक्षक मंडळ उपस्थित होते.
स्वतंत्रमध्ये खुशबू, देवकर बंधू, अलंकार, ब्रिजेश रावळ व विज़यकुमार भंडारे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. कृष्णा-कोयना मंडळ, अंजठा रिक्षा युनियन व बाल गणेशने उत्कृष्ट मिरवणूक पुरस्कार मिळवला.
कराड शहर विभागात…
1) प्रथम : जय जवान जय किसान मंडळ, शुक्रवार पेठ
2) द्वितीय : कमानी मारुती मंडळ, गुरुवार पेठ
3) तृतीय : हनुमान गणेश मंडळ तृतीय
4) उत्तेजनार्थ : हिंदुतेज मंडळ, शिंदेगल्ली व शहीद भगतसिंग मंडळ, मलकापूर
कराड ग्रामीण विभागात…
1) प्रथम : बाल क्रीडा मंडळ, प्रथम
2) द्वितीय : सिद्धिविनायक मंडळ, सैदापूर
3) तृतीय : कोयना मंडळ, कोयना वसाहत
4) उत्तेजनार्थ : शिवतेज मंडळ, आगाशिवनगर व राधाकृष्ण मंडळ, सैदापूर
सजावटीत मार्केटचा राजा प्रथम
उत्कृष्ट सजावट विभागात कार्वे नाका येथील मार्केटचा राजा मंडळाने प्रथम, तसेच साथीदारने द्वितीय व हिंदुतेजने तृतीय क्रमांक मिळवला. उपक्रमशील मंडळात मंगलमूर्ती, राजसारथी, आगाशिवनगरच्या जिल्हा परिषद गणेश मंडळाने बाजी मारली. पर्यावरणपूरक मंडळात कहऱ्हाड पालिका, येरवळेच्या अष्टविनायक व कार्वे नाका येथील उदय मंडळाने क्रमांक मिळवले.