फलटणमध्ये ट्रान्सफॉर्मर चोरांची टोळीला अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्‍यावेळी संशयितरीत्या फिरताना आढळून आलेल्‍या पाच जणांकडे पोलिसी खाक्‍याने चौकशी केली असता त्‍यांनी काही ट्रान्‍सफॉर्मरची चोरी केली असल्‍याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्‍यांना न्‍यायालयात हजर केले असता त्‍यांना सात दिवसांची पोलिस कोठडीही सुनावण्‍यात आली आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्‍यातून मिळालेल्‍या माहितीनुसार, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत संतोष जगन्नाथ घाडगे, किरण भीमराव घाडगे, सागर युवराज घाडगे, प्रशांत सुनील जुवेकर (सर्व रा. मलटण, फलटण) तर रोहिदास सोपान कदम (रा. चौधरवाडी, ता. फलटण) हे संशयितरीत्या रात्रीच्‍यावेळी फिरताना आढळून आले.

त्‍यावर त्‍यांच्‍याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून गॅस सिलिंडर, कॉपर, कटर आदी साहित्‍य जप्‍त करण्‍यात आले. त्‍यानंतर त्‍यांनी काही ट्रान्सफॉर्मरची चोरी केली असल्‍याची कबुली दिली आहे. या सर्वांना सात दिवस पोलिस कोठडी मिळाली असून, त्यांच्‍याकडून आणखीन काही ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्‍हे उघडकीस येण्‍याची शक्‍यता आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने, महादेव पिसे, नितीन चतुरे, तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी केली.