गणेशमूर्ती विसर्जनासाठी कायमस्वरूपी तलाव हवा; साताऱ्यात बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी

0
147
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक येथील शाहू कला मंदिरामध्ये पार पाडली. या बैठकीमध्ये गणेशोत्सव सोहळ्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत सामोपचाराने घेऊन गणेशोत्सव सोहळा पार पाडणे, पारंपरिक वाद्यांसह डॉल्बी आणि इतर वाद्यांना अनुमती मिळवणे, श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कायमस्वरूपी तलाव हवा, अशा मागण्या आणि अनेक महत्त्वाच्या सूचना कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या.

साताऱ्यात मंगळवारी पार पडलेल्या बैठकीस सातारा शहराचे माजी नगराध्यक्ष अशोक मोने, अभिजित बारटक्के, अक्षय गवळी, विश्वजीत बालगुडे यांच्यासह शहरातील विविध मंडळांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिवर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्याच्या मिरवणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात मिरवणूक विस्कळीत होते, तसेच पोलिसांकडून विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्याचा आग्रह धरला जातो. याविषयी ‘कार्यकर्ता आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय हवा, त्या पद्धतीच्या मार्गदर्शक सूचना गणेशोत्सव काळात प्रदर्शित केल्या जाव्यात’, अशा अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.