माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांच्या प्रयत्नातून ‘या’ गावासाठी 4 कोटी 22 लाखाचा निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत कार्वे गावातील गोपाळनगर व वाढीव वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली असून ४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला आहे.

याबाबतचे मंजुरी पत्र कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात, ग्रामपंचायत सदस्य सागर देसाई, अभिजीत वायदंडे, विठ्ठल हुलवान आदींनी ग्रामस्थांच्या वतीने आ. चव्हाण यांच्याकडून स्वीकारले. यावेळी युवानेते इंद्रजित चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर उपस्थित होते. कार्वे गावच्या पिण्याच्या पाणी योजनेसाठी इतका भरघोस निधी मंजूर केल्याबद्द्ल माजी सरपंच वैभव थोरात व ग्रामपंचायत सदस्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले.

कार्वे गावासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१३-१४ साली पेयजल योजना मंजूर झालेली होती. या योजनेचा विस्तार संपूर्ण गावामध्ये १६ कि.मी. इतका असून वॉर्ड क्र. ४ मध्ये पाण्याची टाकी २.५० लाख लिटर व वॉर्ड क्र. ५ मध्ये पाण्याची टाकी १.६५ लाख लिटर एवढी क्षमता आहे. तसेच त्यानंतर गोपाळनगर व आसपासच्या वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व योजना मंजूर होणे आवश्यक असल्याने ही योजना मंजूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.

हि योजना गावासाठी अत्यंत महत्वाची असल्याने कार्वे गावच्या वस्त्यासाठी ४ कोटी २२ लाखांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून कार्वे गावच्या आसपासच्या वस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून पाणी योजना लवकरच पूर्ण होऊन स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार 24 बाय 7 योजनेतून मिळणार आहे.