सातारा प्रतिनिधी | मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या संशयिताला नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन दरम्यान जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. गणेश शंकर माळवे (वय २५, रा. वर्धनगड, ता. खटाव), असे संशयिताचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांनी सूचना केल्याप्रमाणे पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन राबवले. सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन राबविताना चोरीच्या गुन्ह्यातील फरारी संशयित हाती लागला.
पुसेगाव पोलिसांच्या पथकाने सापळा रचून वर्धनगड गावातून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला गुन्ह्याच्या तपासासाठी मेढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कोरेगावचे डीवायएसपी राजेंद्र शेळके, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, उपनिरीक्षक सुधीर येवले, सहाय्यक फौजदार सुभाष शिंदे, हवालदार योगेश बागल, पोलीस नाईक तुषार बाबर, उमेश देशमुख, अमोल जगदाळे यांनी ही कारवाई केली.