कराड प्रतिनिधी । इनरव्हील क्लबच्या वतीने आणि कृष्णा हॉस्पिटलच्या सहकार्याने शुक्रवार, दि. 25 ऑगस्ट रोजी अंगणवाडी सेविकांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तसेच ईसीजी तपासणी आयोजित करण्यात आली आहे. सदर तपासणी कार्वे-गोळेश्वर रोडवरील सिद्धार्थ मंगल कार्यालयात करण्यात येणार असून आशा सेविकांनी तपासणी करून घ्यावी.
या शिबिरात सुमारे 700 अंगणवाडी सेविका तपासणीसाठी येणार आहेत. स्वतः डॉ. सुरेश भोसले, नर्सिग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते यांच्यासह 26 जणांची टीम असणार आहे. ब्रेस्ट कॅन्सर तपासणी बरोबरच कॅन्सर अवेअरनेस संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा तरुणा मोहिरे, सेक्रेटरी छाया पवार यांनी केले आहे.