सातारा प्रतिनिधी । टेम्पोची काच फोडुन १ लाख ४ हजार ५७५ रुपयांची रक्कम असलेली बॅग चोरीस गेल्याची घटना आसले (कुमारवाडी) ता. वाई गावच्या हद्दीत घडली होती. या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भुईंज पोलीसांनी अधिक तपास केला असता हा चोरीचा बनाव असल्याचे उघड झाले. दरम्यान, या प्रकरणी भुईंज पोलिसांनी ४ आरोपीना अटक केली असून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
राहुल अंकुश गोळे (वय २६, रा. जानकर कॉलनी मंगळवार पेठ सातारा), ओमकार रमेश गोळे (वय १८. रा. जानकर कॉलनी मंगळवार पेठ सातारा), अभिजीत अंकुश गोळे (वय ३५, रा. जानवार कॉलनी मंगळवार पेठ सातारा), मयुर आनंदराय किर्यत (वय ३२, रा. करने पेठ सातारा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ३०/११/२०२३ रोजी २१.०० वा सुमारास यातील फिर्यादिचे साथीदार राहुल अंकुश गोळे व मयुर आनंदराय किर्दत यांच्या सोबत मेडिकल औषधाच्या बॉक्सची विक्री करुन मिळालेले १ लाख ४ हजार ५७५ रुपये एका प्रे रंगाच्या बॅगेमधून त्याच्या साथीदाराच्या मालकिचा टेम्पो महिंद्रा सुप्रो क्र. (MH ११ CH ९३७५) मधुन वाई ते पाचयड मार्गे जात होता. आसले (कुमारवाडी) ता. वाई गावचे हद्दीत आल्यानंतर फिर्यादि यांच्या गाडीतील साथीदारास टॉयलेट ला लागलेने तसेच दारुच्या दुकानातून विकत घेतलेली दारु पिणेसाठी टेम्पो रोडच्या कडेला उभा करुन लॉक केला व ते बाजुच्या शेतात गेले.
थोड्या वेळाने ते तीघेही परत आले असता त्याना टेम्पोची डाव्या बाजुची काच फुटलेली दिसली व त्यामधील पैशाची बॅग चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा उघड करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग बाळासाहेब मालचिम यांनी भुईंज पोलिसांना सूचना दिल्या.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने स.पो.नि. श्री रमेश गर्जे यांनी इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फिर्यादी व त्याचे साथीदार यांचेकडे सदर घडलेल्या प्रकाराबाबत सखोल चौकशी केली असता त्यांच्या चौकशीत काही संशयास्पद गोष्टी आढळुन आल्या. म्हणून त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता फिर्यादीसोबत असलेले त्यांचे साथीदार राहुल अंकुश गोळे व मयुर आनंदराव किर्दत त्यांनी त्यांचे सातारा येथील इतर २ साथीदार यांचेसोबत संगणमत करुन गुन्हयाचा कट रचुन फिर्यादीला शेतामध्ये पुढे पाठवुन पाठीमागे सदर पैशाची बॅग त्यांचे साथीदाराकडे दिली.
गाडीची काच फोडून चोरीचा बनाव केल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे सातारा येथील त्यांचे साथीदार यांना देखील लगेच ताब्यात घेऊन चारही आरोपींना गुन्हयात अटक करुन त्यांची न्यायालयाकडुन २ दिवस पोलीस कोठडी घेतली. त्यांच्याकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली १ लाख ४ हजार ५७५ रक्कम असलेली बॅग हस्तगत करण्यात आलेली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि रमेश गर्ने, पोउनि विशाल भंडारे, स. की, अवघडे, स.फी राजे, पो. हवा. नितीन जाधव, पो.हवा राजाराम माने, सुहास कांबळे, पोना सुशांत धुमाळ, पो कॉ. रविराज वर्णकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निबाळकर यानी सदर कारवाईत सहभाग घेतला आहे सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर ४ तासात उघडकीस आणले बाबत सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा.अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.