सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील होमगार्ड अनुशेष नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून (६ ऑगस्ट) राबविण्यात येणार आहे. १० ऑगस्ट पर्यंत दरम्यान ही प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी सोनगाव (ता. सातारा) येथील हॉटेल शिवार ढाबा ते शेंद्रे या सार्वजनिक रस्त्यावर उमेदवारांची ८०० मीटर व १६०० मीटर धावणे आणि मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.
या नोंदणी प्रक्रियेसाठी सोनगाव ते शेंद्रे मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ६ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यत वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. सोनगाव येथुन येणारी वाहने ही शिवार हॉटेल येथुन एस.पी.एस. कॉलेज पासुन खिंडवाडीमार्गे शेंद्रेकडे किंवा सातारा शहराकडे जातील. सोनगाव येथून येणारी वाहने ही सोनगाव फाटा येथुन कुरणेश्वर, बोगदा मार्गे सातारा शहरात जातील.
शेंद्रे किंवा सातारा शहरातून सोनगावकडे जाणारी वाहने ही खिंडवाडी येथुन एस.पी.एस. कॉलेज, शिवार हॉटेल, सोनगाव फाटा मार्गे किंवा बोगदा येथुन कुरणेश्वर, सोनगाव फाटा मार्गे सोनगावात जातील. शेंद्रे येथील झेंडा चौक ते हॉटेल शिवार ढाबा हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
वाहतुक ज्या-ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे, अशा सर्व ठिकाणी दिशा दर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतुक मार्गात केलेल्या बदलाची नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.