…म्हणून प्रकाश आंबेडकर मोदींवर आरोप करतायत; माजी खासदार साबळेंनी सांगितलं नेमकं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ‘इंडिया’ आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे सनसनाटी निर्माण करून आपली दखल घेण्यासाठी प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत आहेत. त्यांचा राजकीय इतिहास पाहिला, तर त्यांना सोबत घ्यायला कोणी तयार नाही. आंबेडकर हे तर्कविसंगत, बेलगाम वक्तव्ये करतात. दृष्ट भावनेने भाजप, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर देखील बेछूट टीका करत असल्याचे कारण सांगत भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात माजी खासदार साबळे यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार साबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची, संस्कृतीची आणि मानवतेशी कायम प्रामाणिक राहून संविधानाची निर्मिती केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून दीड लाख सेवा प्रकल्प उभे केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी किती सेवा प्रकल्प राबवले आहेत, हे जाहीर करावे.

प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय इतिहास पाहिला, तर त्यांना सोबत घ्यायला कोणी तयार नाही. तरी देखील प्रकाश आंबेडकर हे पीएम मोदींवर हिटलरचा आरोप करतात, हे दुर्दैवी आहे,’ अशी खंत यावेळी माजी खासदार साबळे यांनी व्यक्त केली.