जिल्ह्यातील येरळवाडी धरणात परदेशी पाहुण्यांचे आगमन; लेसर फ्लेमिंगो, स्टार्क पक्ष्यांच्या रांगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्या ठिकाणी परदेशी पक्षी त्यांच्या हंगामात येतात. असेच एक ठिकाण म्हणजे खटाव तालुक्यातील येरळवाडी धरण होय. या ठिकाणी वीस टक्केच मृत पाणीसाठा उरला असताना ऐन गुलाबी थंडीत धरणात लेसर फ्लेमिंगो आणि स्टार्क पक्षी या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. या हालचालीमुळे मोठे फ्लेमिंगो (ग्रेटर) पक्ष्यांचे कमी पाण्यात आगमन होत आहे.

मागीलवर्षी गतवर्षी जुलै महिन्यात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले होते. या क्षणाचा पर्यटक आनंद घेत होते. मात्र, यंदा तालुक्यांसह अनेक भागात पावसाने दडी मारल्याने येरळा धरणात प अवघा वीस टक्केच पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे ऐन गुलाबी थंडीची चाहूल लागताच लेसर फ्लेमिंगो आणि स्टार्क पक्षी या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे. फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्षी न पर्यटकांना आणि पक्षीप्रेमींना भुरळ घालणाऱ्या या पक्ष्यांना समुद्रपक्षी म्हणून ओळखले जाते.

त्यात लेसर पक्षी फ्लेमिंगोंची जात सर्वांत लहान च प्रजाती आहे. या पक्ष्यांचा गुलाबी, पांढरा पिसारा, लांब मान काळ्या टीप असलेली गडद लाल चोच, खोल पिवळसर केशरी डोळे, लालसर तपकिरी अंगठी आणि गडद नंगी त्वचा, काळ्या प्राथमिक आणि दुय्यम उड्डाण पंख, लाल आवरण आणि लांब गुलाबी पाय, अशा पद्धतीचे निसर्गाचे वरदान लाभलेल्या पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या पक्ष्यांना पाहण्याची ओढ लागलेली असते. रोहित पक्षी प्रामुख्याने मंचुळ पाणथळ जागा, उथळ पाण्याचे तलाव, बी, दलदलीचे प्रदेश सरोवर व खाडी ळ ठिकाणी थव्याने आढळतात. ऋतू क्षी जसजसे बदलतात तसे अन्न व ऊब यांच्या शोधात हे पक्षी स्थलांतर करतात.