कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारे कुरेशी टोळीतील पाचजण 2 वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरात पोलिसांच्या वतीने नुकतीच धडक कारवाई करण्यात आली आहे. गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तल करणाऱ्या कुरेशी टोळीतील पाच जणांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आहे.

कुरेशी टोळीचा प्रमुख तय्यब आदम कुरेशी, आरीस गफुर कुरेशी, बिलाल रफिक कुरेशी, झिशान ऊर्फ दिशान इमाम बेपारी ऊर्फ कुरेशी आणि आबु ऊर्फ अल्ताब अफसर कुरेशी (सर्व रा. कुरेशीनगर, फलटण) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्यानं गुन्हे करणाऱ्या या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि पुणे जिल्ह्यातील बारामती तसंच पुरंदर तालुका हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास, कत्तलीसाठी वाहतूक करण्यास मनाई असताना कुरेशी टोळीवर गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केल्याचे गुन्हे दाखल होते. फलटणचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी कुरेशी

टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या टोळीकडून सातत्यानं गुन्हे होत असल्यानं त्यांच्यावर कारवाईची मागणी जनतेतून करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर हद्दपारीच्या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर त्यांनी या टोळीला हद्दपार करण्याचा आदेश पारित केला.