सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव याठिकाणी सत्यशोधक समाज स्थापन करण्यात आला. शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक समाज संघ व सत्यशोधक समाज महिला संघाच्यावतीने रविवार, दि.१० मार्च रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर राज्यस्तरीय महिला राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अरविंद खैरनार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पहिल्या महिला राज्य अधिवेशनाचे उदघाटन राज्य महिला अयोग्य अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून स्मिता पानसरे,सुजाता गुरव,वासंती नलावडे,दर्शन पवार,झेबुनिस्सा शेख,उपस्थित राहणार आहे. यावेळी अधिवेशनामध्ये प्राचीन भारतातील क्रांतिकारी महिला कालानंतराने गुलाम का? झाली या विषयावर गटचर्चा होणार असून अध्यक्षस्थानी अँड.वैशाली डोळस या आहे. यावेळी अधिवेशनामध्ये विविध ठराव पारित केले जाणार आहे.
या अधिवेशनानिमित्त ह.भ.प.भोईर महाराज यांचे सत्यशोधकीय कीर्तन होणार आहे. या अधिवेशनासाठी विदर्भ,मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील महिला सहभागी होणार आहे .या शनिवार 9 मार्च रोजी पारगाव विराज हॉलमध्ये मी सावित्री बोलतेय हा एकपात्री वैशाली धाकुलकर यांचा प्रयोग सादर करण्यात येणार असून दिपस्तंभ या विषयावर प्रबोधन कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाला महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन अरविंद खैरनार, सुरेश झाल्टे,वंदना बनकर,उज्ज्वला तांबे,रुपाली इंगोले यांनी केले आहे.