छत्रपती शिवरायांच्या वाघनखांची पहिली झलक समोर; साताऱ्याच्या संग्रहालयात पाहता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कडक पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे काल सायंकाळी साताऱ्यात दाखल झाली आहेत. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असताना राज्य सरकारकडून लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून ही वाघनखे भाडेतत्वावर सहा ते सात महिन्याच्या कालावधीसाठी भारतात आणण्यात आलेली आहेत. या वाघनखांची पहिली झलक समोर आली आहेत.

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्तात हि वाघनखे ठेवण्यात आली आहेत. प्रतागडावर अफजलखानाचा वध करण्यासाठी या वाघनखांचा वापर करण्यात आला होता. मात्र काही इतिहास अभ्यासकांनी या वाघनखांवर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता दिलेल्या तारखेच्या दोन दिवस आधीच ही वाघनखे साताऱ्यात आणण्यात आली आहेत.

साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष देखील तयार करण्यात आला आहे. यानंतर सहा ते सात महिने ही वाघनखे या संग्रहालयात नागरिकांना पाहता येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती अफझल खानला मारण्यासाठी वापरलेली वाघ नखेलंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. या वाघनखांची पहिली झलक आता समोर आली आहे.