सातारा प्रतिनिधी । सोनगाव – शेंद्रे रोडवरील सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपो नजीक असलेल्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी घडली. हवेमुळे उसळणारे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात परिसरात पसरले. या घटनेनंतर भंगाराच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा पालिकेचा सोनगाव शेंद्रे येथे कचरा डेपो आहे. शहर व परिसरातून दररोज संकलित होणाऱ्या या कचऱ्याची या डेपोत विल्हेवाट लावली जाते. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, मिथेन वायूमुळे कचरा पेटण्याच्या घटना सातत्याने घडू लागतात.
सोनगाव-शेंद्रे रोडवरील भंगाराच्या दुकानाला भीषण आग pic.twitter.com/hjhgNS32lC
— santosh gurav (@santosh29590931) March 24, 2024
दरम्यान, आज दुपारी कचरा डेपोच्या हद्दीत असलेल्या एका भंगाराच्या दुकान दुकानात व परिसरात मोठ्या प्रमाणात भंगाराच्या साहित्य ठेवण्यात आले होते. त्यास अचानक आग लागली. या आगीमुळे शेंद्रे परिसरातही या धुराचे लोट पसरले.
या घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या विभागास नागरिकांनी दिली असता अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेचकर्मचाऱ्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. या आगीमध्ये भंगाराच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.