ऐतिहासिक वसंतगडावरील वणवा आटोक्यात; आग विझवताना दोघेजण जखमी

0
212
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील किल्ले वसंतगडावर लागलेली आग दिन दिवसानंतर आटोक्यात आली आहे. भीषण आगीमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती जळत असल्याने ती वाचवण्यासाठी टीम वसंतगडचे मावळे आणि स्टुडंटस पॉवर सांगलीच्या तरुणांनी जिवाची पर्वा न करता जखमी होऊनही वणवा विझविण्यात यश मिळवले.

किल्ले वसंतगडला दोन दिवसांपासून वणवा लावण्याचे सत्र सुरू होते. त्याची माहिती मिळताच टीम वसंतगडचे मावळे आणि स्टुडंट्स पॉवर सांगलीचे तरुण यांनी वसंतगडावर धाव घेतली. तेथे वारेही वेगाने वाहत असल्याने आग रौद्ररूप धारण करत होती. मात्र, वाऱ्यामुळे आग लवकर आटोक्यात आणणे शक्य होत नव्हते. मात्र, तरीही संबंधित मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता तब्बल आठ तासांच्या अथक परिश्रमाने आग विझवून वसंतगडला लागलेला वणवा विझरविला. त्यामुळे वसंतगडावर असलेल्या सुमारे १०० ते १५० गायी, पशुपक्षी यांची जीवितहानी टाळण्यात यश आले.

अनेक वर्षांपासून करण्यात आलेल्या वृक्षारोपनातील झाडेही वाचविण्यात यश आले आहे. त्याचबरोबर सुमारे दोन लाखांचे ठिबक संचही वणव्यातून बचावले. दरम्यान या मोहिमेत टीम वसंतगडचे दोन दुर्ग सेवक दत्ता जामदर व सिद्धार्थ पाटील हे जखमी झाले. त्यांचे बूट आणि कपडेही आग विझविताना थोडेफार जळाले. मात्र, त्यांनी तशा परिस्थितीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.