सातारा प्रतिनिधी । पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चाहूर येथील भंगार दुकानाला मंगळवारी सकाळी भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या भीषण आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भंगार दुकानाला मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. दुकानातून धूर येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी अग्निशमन व पोलिस दलाला याची माहिती दिली. त्यानंतर सातारा पालिकेचे बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले. परंतु, तोपर्यंत आग वाढली होती.
सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत दुकानातील सुमारे ५ लाख रुपये किमतीचे भंगाराचे साहित्य जळून खाक झाले. तसेच दुकानाशेजारी असलेल्या डंपरलाही आग लागली होती. यामध्ये डंपरचे मागचे टायर जळून नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.