सातारा जिल्ह्यातील लालचुटुक स्ट्रॉबेरीच्या शेतकऱ्यांवर ‘तापमानवाढी’मुळं नुकसानीचं संकट!; उत्पादनाला बसणार फटका

0
166
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात ऐन फेब्रुवारी महिन्यापासून तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअस गेल्याने याचा शेतीसह सर्वच दैनंदिन व्यवहार परिणाम झाला आहे. सध्या खास करून स्ट्रॉबेरी आणि आंबा या पिकावर वाढत्या तापमानाचा परिणाम होत असून स्ट्रॉबेरीचा आकार, लवकर परिपक्वता, फुलगळती तर आंब्याची फळगळती होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि वाई, जावळी तालुक्यात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी जास्त असून त्यांच्या स्ट्रॉबेरी पिकांवर परिणाम होत असलयामुळे नुकसानीचं संकट कोसळलं आहे.

सातारा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला असून सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाच्या झळा बसत असल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या उसाला काहीसा ब्रेक लागला आहे. महाबळेश्वर, जावळी, वाई तालुक्यातील स्ट्रॉबेरी हंगामाला फटका बसत आहे. सध्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्यातील हंगाम सुरू असून उन्हाच्या तीव्रतेमुळे स्ट्रॉबेरी लवकर पक्व होऊ लागली आहे.

स्ट्रॉबेरी फळाना चटके पडणे, कमी आकारमानात ही पक्व होत असल्याने वजन कमी होणार असून चवीवरही परिणाम होणार आहे. यामुळे अंतिम टप्प्यात होणाऱ्या फायदा शेतकऱ्यांचा मिळणार नाही. आंबा मोहरातून फळधारणेच्या सुरू झाली आहे. तापमानवाढी फळगळ असून मोठ्या फळांना चट्टे पडत आहेत. तर तापमान वाढीमुळे स्ट्रॉबेरी फळांच्या अगोदर उमलणारी फुले हि कोमेजून जात असून त्याचे फळांमध्ये रूपांतर होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.

स्ट्रॉबेरीचे उन्हापासून संरक्षणसाठी नेटच्या आच्छादन : उमेश खामकर

महाबळेश्वर आणि वाईची स्ट्रॉबेरी विशेष प्रसिद्ध असून, सध्या अनेक शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. आम्ही वाई तालुक्यात पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. साधारणतः सहा महिन्याचा फळांचा कालावधी असल्याने या स्ट्रॉबेरी शेतीतून चांगले उत्पादन मिळते. मात्र, सध्या वातावरणात उष्णता वाढू लागली असल्यामुळे त्याचा फटका स्ट्रॉबेरी फळावर बसू लागला आहे. तापमान वाढीमुळे फुल गळती होऊ लागली असून स्ट्रॉबेरीचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही नेटच्या आच्छादन केले असल्याची प्रतिक्रिया वाई तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उमेश खामकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.

वातावरणातील बदल शेतकऱ्यांसाठी ठरलाय डोकेदुखी

दर्जेदार म्हणजेच एक नंबर दर्जाची स्ट्रॉबेरी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दरापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच बहुतांशी हा माल प्रक्रियेसाठी द्यावा लागत असल्याने अपेक्षित पैसे मिळत नाहीत. उष्णता वाढीमुळे फुलगळ होत असल्यामुळे फळाविना झाडे पोसण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास या हंगामात ५० टक्के उत्पादनात घट होण्याचा शक्यता वर्तवली जात आहे. स्ट्रॉबेरीस भांडवली खर्च जास्त असल्याने वातावरणातील बदल हा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे.

तापमान वाढीचा असा होतो परिणाम

हवामानातील बदलामुळे तापमानात वाढ होते ज्यामुळे स्ट्रॉबेरीच्या झाडावर उष्णतेचा ताण पडतो ज्यामुळे फुलांची कमतरता येते, फळे लवकर पिकतात ज्यामुळे फळांचे गुण कमी होतात, लहान आकार, कमी साखर, कमी सुगंध आणि खराब पोत. याव्यतिरिक्त, कीटक आणि रोगांच्या प्रादुर्भाव आणि तीव्रतेवर परिणाम होतो

स्ट्रॉबेरीबद्दलची माहिती

स्ट्रॉबेरी हे फळ संकरीत प्रजाती पोटजात Fragaria मधले असून त्याचे शास्त्रीय नाव Fragaria ananassa आहे.
स्ट्रॉबेरी हे मूळ उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण भागात आहेत.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्सचे उच्च प्रमाण असते.
स्ट्रॉबेरी हे मॅग्नेशियमचे देखील एक उत्कृष्ट स्रोत आहेत.
स्ट्रॉबेरीमध्ये फॉस्फरस असते.
स्ट्रॉबेरी हे कर्करोग, मधुमेह, स्ट्रोक आणि हृदयरोग यासारख्या गंभीर आरोग्य स्थितींचा धोका कमी करण्यास मदत करते.
योग्य काळजी घेतल्यास स्ट्रॉबेरी बेड तीन ते पाच वर्षांपर्यंत चांगले पीक देईल.
लागवडीनंतर एका वर्षापासून सुरुवात होईल.