माजगावकर माळावर दोन गटांमध्ये मारामारी; परस्परविरोधात गुन्हे दाखल

0
516
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | माजगावकर माळ झोपडपट्टीत दोन गटांत झालेल्या मारामारीप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पाचजणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना दि. १७ रोजी घडली.

चांदणी लखन मोरे (वय ३०, रा. माजगावकर माळ झोपडपट्टी, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साहिल सावंत, विजय कांबळे, अजय कांबळे, रोशन जगताप (सर्व रा. माजगावकर माळ झोपडपट्टी, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदणी मोरे यांचे पती लखन मोरे (३५) यांच्या डोक्यात एका संशयिताने कोयत्याने वार केला.

हे भांडण सोडवायला गेलेल्या पुतण्या व पुतणीलाही त्यांनी मारहाण केली. तसेच या भांडणात दोन ग्रॅम सोन्याच्या वाट्या पडून गहाळ झाल्या. दुसरी तक्रार अक्षय कृष्णदेव जगताप (२७, रा. माजगावकर माळ झोपडपट्टी) यांनी दिली आहे. त्यानुसार लखन भीमराव मोरे याच्यावर दुखापत व जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. आई शकुंतला यांना लखन याने शिवीगाळ केली. त्याबाबत विचारणा केल्यावरून शिवीगाळ करत त्याने डोक्यात दगड मारला. भांडण सोडवायला आलेल्या वडील, बहीण यांना धक्का-बुक्की केली. तसेच पत्नीच्या गळ्यातील ७४ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून घेतले.