नांदगावात 2 गटात तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी तक्रारी दाखल, 28 जणांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | तीन महिन्यापुर्वी झालेल्या यात्रेतील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून दोन गटात लाकडी दांडकी, लोखंडी रॉडचा वापर करून तुंबळ हाणामारीची घटना सातारा तालुक्यातील नांदगाव येथे स्वागत कमानीजवळ दि. १ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. यात चार जण जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी महेश विलास घोरपडे (रा. नांदगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित महेश बाजीराव जगदाळे, किशोर बाजीराव जगदाळे, ओंकार गोविंद जगदाळे, तेजस प्रकाश जगदाळे, तन्मय तानाजी जगदाळे, सुमित तुषार जगदाळे, सौरभ सुनील जगदाळे, रुपेश राजेंद्र जगदाळे, तुषार शिवाजी जगदाळे, अभिजीत रामचंद्र जगदाळे (सर्व रा. नांदगाव, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत फिर्यादी महेश बाजीराव जगदाळे (रा. नांदगाव, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित राहुल अशोक देशमुख, श्रीकांत लालासो देशमुख, सचिन प्रकाश घोरपडे, ऋषिकेश पाटणकर, महेश विलास घोरपडे, मनोज भालचंद्र चव्हाण, शेखर घोरपडे, सुभान विजय घोरपडे, पवन विजय घोरपडे, शंभू प्रकाश घोरपडे, लखन घोरपडे, निलेश मधुकर घोरपडे, सोन्या घोरपडे, साहिल घोरपडे, वैभव चव्हाण, पीटर घोरपडे (सर्व रा. नांदगाव, ता. सातारा) यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार फिरोज शेख व सहाय्यक फौजदार हिम्मत दबडे-पाटील करत आहेत.