कवठेला हळदीचे गाव तर बोपेगावला हळद संशोधन केंद्र करावे; शेतकऱ्यांची खा. नितीनकाकांकडे मागणी

0
269
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यात वाई हा हळद उत्पादन घेणारा प्रमुख तालुका असून येथे सर्वाधिक हळदीचे पीक घेतले जात आहे. भविष्यात हळद या पिकाकडे शाश्वत व निर्यातक्षम बाजारपेठेच्या दृष्टीने बघितले जात आहे.त्या अनुषंगाने उत्पादन वाढ, जातीनिहाय अभ्यास, प्रक्रिया, उद्योग व साठवणुकीच्या दृष्टीने या तालुक्यात हळद संशोधन केंद्राची गरज आहे. यासाठी तालक्यातील कवठे हे हळदीचे गाव व कवठे, बोपेगाव येथे हळद संशोधन केंद्र सुरू करवे, अशी मागणी कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकऱ्यांनी खासदार नितीन पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पवार, बाजार समितीचे संचालक राहुले डेरे आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, वाई तालुक्यात उसाबरोबर हळदीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे सरी ऐवजी वाफा पद्धत व ठिबकचा वापर करून त्यांनी आपल्या उत्पादनामध्ये भरीव वाढ केली आहे. या ठिकाणचे हवामान, जमीन, पाणी यामुळे उत्पादित होणाऱ्या हळदीमध्ये करकुमीन या घटकाचे प्रमाण ५-६ टक्के आढळून येते.

याचे कारण प्रामुख्याने एकात्मिक अन्न द्रव्य, कीड-रोग व्यवस्थापन व लागवडीत केलेला बदल यामुळे उत्पादन व गुणवत्ता वाढली आहे. तालुक्यातील शेतकरी हळदीची लागवड करतात व पुढील प्रक्रिया काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, इतर देशात असणारी मागणी या सर्व बाबींचा विचार करून या पिकाच्या वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कवठे, बोपेगाव, पांडे येथील शेतकरी पारंपरिक जातींबरोबरच नवीन फुले हरिद्रा या जातीची लागवड करून उच्चांकी उत्पादन घेत आहेत. जागतिक बाजारपेठेत वाढत असलेली हळदीची मागणी पाहता व देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या हळदीमध्ये वाईतील हळद गुणवत्तेमध्ये अव्वल स्थानावर आहे. जिल्ह्यात फळांचे गाव धुमाळवाडी, मधाचे गाव मांघर, पुस्तकाचे गाव भिलार याच धर्तीवर ऐतिहासिक कवठे गावास हळदीचे गाव तर कवठे, बोपेगाव येथे हळद संसोधन केंद्र स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.