सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील कारखानदारांनी गेल्या वर्षीच्या उसाला अंतिम भाव 3300 ते 3400 रुपये जाहीर करावा, अन्यथा कारखानदारांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील सर्व विविध पक्षाच्या पदाधिकारी व शेतकऱ्याच्या वतीने नुकतीच फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची भेट घेण्यात आली. यावेळी आझादसिंह उर्फ शंभूराज खलाटे, अशोक सस्ते, बजरंग गावडे, महादेवराव कदम, मच्छिंद्र निकम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखाना, स्वराज्य इंडिया लिमिटेड उपळवे, शरयू शुगर प्रायव्हेट लिमिटेड, मोटेवाडी व श्री दत्त इंडिया शुगर, साखरवाडी या कारखानदारांनी गेल्या वर्षीच्या उसाला अंतिम भाव 3300 ते 3400 रुपये जाहीर करावा, अन्यथा कारखानदारांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना या कारखान्यांनी अनुक्रमे 3411 व 3350 चे अंतिम दर मागील हंगामातील उसासाठी जाहीर केलेले आहेत. फलटण तालुक्यातील कारखानदार मूग गिळून गप्प असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.