सातारा प्रतिनिधी | बीआरएस पक्षाने आपकी बार किसान सरकार…चा नारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारला BRS च्या माध्यमातून उखडून टाकणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी भारत राष्ट्रीय समितीची BRS बैठक रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रघुनाथदादा म्हणाले, येत्या 9 ऑगस्ट क्रांतीदिनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के .सी राव यांचा इचलकरंजी येथे सत्काराचे आयोजन केले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो शेतकरी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातून ११ हजार कार्यकर्ते जाणार आहेत.
केसीराव यांचा पक्ष स्वीकारण्यामागचे कारण म्हणजे ते शेतकरी हिताचे निर्णय घेत आहेत. भारत राष्ट्र समितीने आपकी बार किसान सरकारचा नारा दिला आहे. त्यामुळे आम्ही तन-मन-धनाने त्यांच्यासोबत असल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले आहे.