5 हजार क्विंटल बियाणे अन् 22 हजार मेट्रिक टन खताची विक्री; शेतकऱ्यांकडून पेरणीची लगबग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मान्सून वेळेत सुरू झाला असल्यामुळे बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या सर्वत्र पेरणीसाठी लगबग सुरू झाली असून आतापर्यंत ५ हजार क्विंटल बियाणे आणि २२ हजार मेट्रिक टन खताची विक्री झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जात असल्याने दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे 3 लाख हेक्टरवर असते. यावर्षीच्या खरिपासाठी २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र राहील, असा अंदाज आहे. यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे मिळण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे.

बाजारपेठेत २८ हजार १६२ क्विंटल बियाणे उपलब्ध

यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यासाठी ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, भात, वाटाणा, घेवडा आदी बियाण्यांचा समावेश आहे. यातील ९ हजार ३६५ क्विंटल बियाणे हे महाबीज आणि एनएससीकडून मिळणे अपेक्षित आहे, तर ३५ हजार क्विंटल बियाणे हे खासगी क्षेत्रातून उपलब्ध होईल. सध्या जिल्ह्यातील बाजारपेठेत २८ हजार १६२ क्विंटल बियाणे उपलब्धही झाले आहे. यातील ९ हजार ३६५ क्विंटल बियाणे हे महाबीज आणि एनएससीकडून मिळणे अपेक्षित आहे, तर ३५ हजार क्विंटल बियाणे हे खासगी क्षेत्रातून उपलब्ध होईल. सध्या जिल्ह्यातील बाजारपेठेत २८ हजार १६२ क्विंटल बियाणे उपलब्धही झाले आहे.

12 भरारी पथके करणार धडक कारवाई

दरवर्षीच खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके स्थापन केली जातात. ही पथके बोगस खते, बियाणेप्रकरणी कारवाई करतात. आताही कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक तालुक्यात एक अशी मिळून १२ पथके स्थापन केली आहेत. त्यांचे लक्ष बोगस खते, बियाणे विक्री, भेसळ यावर असणार आहे.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी कोणतीही अडचण येणार नाही : फरांदे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी पूर्ण करता यावी म्हणून कृषी निविष्ठा दुकानातही पुरेसासाठा उपलब्ध आहे. तसेच शासनाकडून देखील अनुदानावर बियाणे दिली जात असल्याने शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ शी बोलताना दिली.