सातारा प्रतिनिधी | राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फलटणच्या कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी ‘ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प’ कार्यक्रमांतर्गत राजापूर (ता.खटाव) खटाव) गावातील शेतकऱ्यांना निंबोळी अर्क बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
किडींचे सेंद्रिय नियंत्रण व रस शोषक किंडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मावा, तुडतुडे, पांढरी माशी, बिटल, अळ्या, फुलपाखरू, पतंग, सुरवंट, खोड कीड, बग आणि हॉपर्स, प्रौढ बिटल, फळमाशी, स्केल कीटक, मिली बग यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी केली जातेर, असे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले.
कार्यक्रमासाठी श्रीरंग घनवट, अमोल झगडे, बाबू घनवट, रोहिणी घनवट, कविता बोराटे, प्रणोती मदने, गजानन घनवट व इतर शेतकरी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर,
कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे व नितिषा पंडित, प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दूत अथर्व देवकर, यश निकम, रोहन बरबोले, पुष्कर बिसेन, सत्यजित धायगुडे, सुयोग भोसले व साहिल भोसले यांनी हा उपक्रम पार पाडला.