कराड शहरात ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ देवघड हापूस आंबा विक्री सुरु; कुठे व किती रुपये दर? ते चेक करा

0
2998
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । यंदाही “हॅलो कृषी आउटलेटच्या शेतकरी ते थेट ग्राहक”च्या माध्यमातून अस्सल देवगडच्या हापूस आंब्याची चव नागरिकांना चाखता येणार आहे. हापूस आंबा म्हटलं तर अनेकदा बाजारात ग्राहकांना हापूस म्हणून कर्नाटकी आंबा दिला जातो. दिसायला हुबेहूब देवगड हापूसप्रमाणे दिसणाऱ्या कर्नाटकी आंब्याचा दर कमी असल्याने नागरिकही हापूस म्हणून तो घरी घेऊन जातात. मात्र, आंब्यात कीड लागणे, गोडीला कमी असणे, चव बरोबर नसणे यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना यामुळे होते. आता याला आळा बसणार असून ‘हॅलो कृषी आउटलेट‘च्या माध्यमातून शेतकरी ते थेट ग्राहक या उपक्रमाअंतर्गत अस्सल कोकणातला देवगड आंबा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हापूस आंब्याचे ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ हे ‘हॅलो कृषी आउटलेट’ कराडमध्ये कुठे आहे?

‘हॅलो कृषी’ हे महाराष्ट्रातील ८ लाख हुन अधिक शेतकऱ्यांसोबत काम करत असून ‘हॅलो कृषी’च्या देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे हापूस आंबे कराड येथील आउटलेटला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. थेट शेतकऱ्याच्या बागेतून आंबे येत असल्याने ओरिजिनल हापूस आंबे अगदी योग्य दरात येथे उपलब्ध आहेत. कराड शहरामध्ये कराड जनता सहकारी बँक परिसरात कराड जनता बझार शेजारी ‘हॅलो कृषी आउटलेट’ सुरू करण्यात आले असून सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत ग्राहकांसाठी खुले आहे.

हापूस आंबा कराड शहरात होम डिलिव्हरी मिळेल…

तुम्हाला जर हॅलो कृषीच्या कोकणातील शेतकऱ्यांकडून हापूस आंबा कराड येथील ‘हॅलो कृषी आउटलेट’ वरती उपलब्ध आहेत. आपल्याला आंबे होम डिलिव्हरी हवे असतील तर shop.hellokrushi.com या वेबसाईटवरून तुम्ही आंबे ऑनलाईन ऑर्डर करू शकता. ऑर्डर केल्यानंतर ३० मिनिट मध्ये कराड शहरात आंबे डिलिव्हरी मिळत आहे. फोनवरून आंबा ऑर्डर करायचा असेल तर तुम्हाला आमच्या 93598 78461 या मोबाईल क्रमांकावर फोन करावा. विशेष म्हणजे तुम्हाला हे आंबे होम डिलिव्हरी सुद्धा मिळतील. होम डिलिव्हरी सेवा कराड, पुणे या शहरात उपलब्ध आहे.

नागरिकांचा मोठा प्रतिसाद

‘हॅलो कृषी’ आउटलेटवर खात्रीशीर ओरिजिनल हापूस आंबे मिळत असल्याने नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय ग्रेड नुसार आंबे मिळत असल्याने संपूर्ण पारदर्शक व्यवहार असलयाने येथे फसवणूक होत नाही असा विश्वास यामुळे येतो आहे. अनेक नागरिक ५-६ डझनाची पेटी खरेदी करत असल्याने यामुळे ‘हॅलो कृषी’च्या शेतकऱ्यांनाही फायदा होतो आहे.

संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे

बाजारात मिळणारे आंबे हे अनेकवेळा केमिकलच्या मदतीने पिकवलेले असतात. त्यामुळे ते आरोग्याला हानिकारक तर असतातच परंतु त्याची चवही थोडी वेगळी लागते. जे आंब्यामधील शौकीन आहेत ते लोक नेहमी अडीत नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबेच घेतात. नैसर्गिक ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेले आंबे लवकर खराब होत नाहीत तसेच सुरकुत्या पडल्या तरी आतमध्ये व्यवस्थित असतात.