वाई तालुक्यातील ओझर्डेत रोटावेटरमध्ये अडकून शेतकरी ठार

0
1419
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील ओझर्डे गावात शेत जमिनीत भर घालत असताना तोल जाऊन ट्रॅक्टरच्या पाठीमागे असलेल्या रोटावेटरमध्ये अडकून शेतकरी ठार झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. राकेश अरविंद फरांदे (वय ३०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

राकेश फरांदे गुरुवारी शेतामध्ये भर घालण्यासाठी गेले होते. भर घालत असताना अचानक राकेश यांचा तोल गेल्याने ते रोटावेटरमध्ये अडकले. यामध्ये ते जागीच ठार झाले. यामुळे शरीराचे तुकडे अस्तव्यस्त पसरले होते.

परिसरात असलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत राकेश राकेश फरांदे यांचा मृतदेह एका ठिकाणी आणून ठेवण्यात आला आणि त्यांच्या कुटुंबीयांना व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.