जावळी तालुक्यात कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यानं केली आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जावली तालुक्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील बेलावडे येथील युवा शेतकऱ्याने तणनाशक पिऊन राहत्या घरातच मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली आहे.

अनिल चंद्रकांत शिंदे असे शेतकऱ्याचे त्यांचे नाव आहे. कर्जवसुलीसाठी खासगी संस्थेने लावलेल्या तगाद्यामुळे अनिल त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सागितलं जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल चंद्रकांत शिंदे यांना दोन एकर शेती असून, त्यांनी एका खासगी संस्थेकडून सात ते आठ लाख रुपये कर्ज घेतले. थकलेला कर्जाचा तगादा संस्थेकडून वारंवार होत होता. त्यांच्याकडील असणाऱ्या दोन एकर शेतीमध्ये कर्जाची परतफेड होण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे कर्ज परत फेडच्या विवंचनेतून अनिल यांनी राहत्या घरी तणनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

अनिल शिंदे हे कुटुंबातील एकमेव कमावते पुरुष सदस्य होते. त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांची एक मुलगी चौथीला आणि एक मुलगा पहिलीत शिकत आहे. घरात अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.