तुर्कीतून बाजरीचे बियाणे आणून काढले 3 फुट लांबीचे कणीस…; ‘माण’च्या शेतकऱ्यानं करून दाखवलं!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पावसाअभावी पिकांना पाणी देणंही मुश्किलीचे बनले असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, दुसरीकडे कायम पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील एका शेतकऱ्याने कमाल करून दाखवली आहे. माण तालुक्यातील पळशी येथील शेतकरी बबन ढोले यांनी तुर्कीतून बाजरीचे बियाणाची आणून त्याची लागवड केली असून या पिकाला ३ फुटांपर्यत कणसे लागली आहेत.

माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र येथील शेतकरी अशा प्रतिकुल वातावरणात देखील शेतीत अनेक यशस्वी असे प्रयोग करतायत. यंदाच्या वर्षी सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तालुक्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांना निसर्गानेही साथ दिली नाही. तरी देखील येथील शेतकऱ्यांनी हार मानली नाही. या तालुक्यातील पळशी येथील शेतकरी बबन ढोले यांनी तुर्कस्तानातील बाजरी लावण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात इतर पिके घेऊन त्यातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा त्यातून तुम्हाला नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती मिळेल आणि त्यातून तुम्हीही स्वतः अनेक पिकांची माहिती घेत उत्तम शेती करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. याव्यतिरिक्त या ॲपमध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी Hello Krushi डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

प्रति एकर 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता

शेतकरी ढोले यांनी तुर्कीतून बाजरीचे बियाणे मागविले आणि ते लावण्याचा प्रयोग केला. आणि ढोले यांचा हा प्रयोग आता यशस्वी झाला आहे. पेरणी केलेल्या बाजरीचे पीक साधारण १२ फुटांपर्यंत वाढले आहे. तसेच कणसाची लांबी साडेतीन ते चार फूट आहे. प्रत्येक कणीस दाणेदार असून बबन ढोले यांनी प्रती एकर सव्वा किलो बियाणे पेरले होते. त्यांना प्रति एकर ४० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.

बाजरी हे जास्त उत्पन्न देणारे पीक

बाजरीचे पीक हे अतिशय कमी पाण्यामध्ये येत असते. त्यात दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याची वारंवार कमतरता भासते. साधारणपणे या बाजरीच्या एका झाडाला तब्बल २.५ ते ३ फुटाचे बाजरीची कणीस येतात. आपल्या कायमच्या बाजरी पिकापेक्षा या तुर्की बाजरीचे भरघोस उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना या तुर्की बाजरी पासून नक्कीच फायदा मिळू शकतो असा विश्वास प्रयोगशील शेतकरी बबन ढोले यांनी व्यक्त केला आहे.

बाजरीच्या पिकासाठी ‘या’ प्रकारची जमीन निवडावी

बाजरी पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने ते कोरडवाहुतही चांगले येते. बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु हा ६.२ ते ७.७ असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी – वरंबा पद्धत फायदेशीर ठरते. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब पिकासाठी योग्य त-हेने उपयोग करुन घेण्यासाठी कमी आणि अनियमित पाऊस पडणा-या प्रदेशात अतिशय हलक्या व हलक्या ते मध्यम उताराच्या जमिनीवर किंवा समपातळीवर नसलेल्या जमिनीवर बाजरीचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी थेंब थेंब संचय पद्धत (सरी-वरंबा पद्धत) अत्यंत उपयुक्त आहे. या पद्धतीत मृगाचा पाऊस पडण्यापूर्वी जमिनीच्या खोलीप्रमाणे ४ ते ६ इंच (१o ते १५ सें.मी.) खोलीच्या ४५ सें.मी. अंतरावर उताराच्या आडव्या दिशेने सन्या तयार करुन ठेवाव्यात. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब सा-यामध्ये संचित करता येतो.