कराड प्रतिनिधी । इंदोली ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र (बी.एड) महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्रमांक एकचा निरोप समारंभ मसूर येथील इंदिरा कन्या प्रशालेत नुकताच पार पडला. यावेळी कापील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लियाकतअली इनामदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र (बी.एड ) महाविद्यालयचे प्राचार्य श्री. सचिन पाटील होते. यावेळी मुख्याध्यापक लियाकतअली इनामदार यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. प्राचार्य सचिन पाटील यांनि सादर केलेल्या वास्तववादी कवितेने उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली. याप्रसंगी इंदिरा कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा पाटील यांनीही छात्राध्यापकांच्या कामाचे कौतुक केले. तसेच याप्रसंगी यशवंत गट कराडच्या मार्गदर्शक प्राध्यापिका के. के. थोरात यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
आंतरवासिता दरम्यान छात्राध्यापकांनी प्रशालेमध्ये घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन गटप्रमुख जयंत पाटील व यशवंत गटातील छात्राध्यापकांनी केले. कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.