कराड प्रतिनिधी । पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजमधून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे. या एक्सप्रेसमुळे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोया झाली असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
रेल्वे सल्लगार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी नुकताच संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रेल्वेने बिकानेर पुणे साप्ताहिक एक्सप्रेस मिरजेपर्यंत सुरू केली होती. मात्र, ही गाडी मिरजेतून पुण्यापर्यंत पुण्यापासून बिकानेर पर्यंत वेगवेगळ्या गाडी क्रमांकाने घावत असल्याने मिरजेतून पुण्यापर्यंत व पुण्यातून बिकानेरपर्यंत वेगवेगळे तिकीट घ्यावे लागत होते. ही गाडी एकाच क्रमांकाचे सोडण्याची मागणी आम्ही पुण्यात झालेल्या रेल्वेच्या समितीच्या बैठकीत केली होती.
आमच्या मागणीची दखल घेत रेल्वेकडून आता 20475/ 20476 या क्रमांकाची गाडी मिरज बिकानेर एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीला वेगवेगळ्या तिकिटाची गरज नसल्याचे तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.
‘या’ वेळेत धावणार पुणे-बिकानेर-पुणे एक्सप्रेस
पुणे-बिकानेर-पुणे एक्सप्रेस ही गाडी बिकानेरवरून सोमवारी सकाळी साडेसात वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी मंगळवारी ही गाडी दुपारी 1.45 मिरजेला पोहोचेल मिरजेतून ही गाडी दर मंगळवारी दुपारी 2:25 ला निघेल आणि बिकानेरला बुधवारी रात्री 8:40 वाजता पोहोचेल. या ट्रेनला कराड,सातारा व लोणंद थांबा देण्यात आलेला आहे. मंगळवारी लोणंद सकाळी 9:30व सातारा 10:42 आणि कराड 11:50 या वेळेवर पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी हीच गाडी मिरजेतून 2:25 सुटणार आहे. कराडला 15:30, सातारा 16:38, लोणंद 17:40, पुणे 20:10 कल्याण 22:20 भिवंडी 23:03 सुरत 3:23 वडोदरा 5:15 आमदाबाद 7:25 आबू रोड 11:30 फाळणा 12:55 मारवाड जंक्शन 14:00 जोधपुर 15:40 मेडता रोड 17:30, बिकानेर रात्री 20:40 हे वेळापत्रक आहे, अशी माहिती तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.