शिवकालीन वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली; ‘इतक्या’ वजनाची आहेत ‘वाघनखं’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात काल शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनंतर आजपासून वाघनखे सर्वसामान्यांसाठी पाहण्यासाठी संग्रहालय खेळे करण्यात आले. सकाळी 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी देण्यात आली असून यासाठी केवळ दहा रुपयांचं तिकीट ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांच्या वाघनखांची लांबी 8.6 सेमी आणि वजन हे केवळ 49 ग्रॅम इतकं आहे.

आज शनिवार सुट्टी असल्यामुळे दिवसभरात मोठ्या संखयेने शिवप्रेमींनी संग्रहालयात येऊन वाघनखांचे याची देही याची डोळा दर्शन घेतले. विशेष म्हणजे फक्त वाघनखंच नाहीत तर इतर शस्त्रास्त्रांचंदेखील प्रदर्शन शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे.

साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सुरु असलेल्या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या प्रदर्शनास एका वेळी दोनशे लोकांना सोडले जात आहे. दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये पहिला प्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवण्यात आलेला आहे.