Satara Lok Sabha Election 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोग आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ घोषणा केली असून याची आचार संहिता दि.16 एप्रिल रोजी सायं 4 वाजल्यापासून जाहिर केली आहे. सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापनच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने नागरिकांना काही शंका किंवा काही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे 24 तास तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी टोल फ्री 1950 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डूडी यांच्याकडून भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिका-यांकडून जप्त केलेल्या रोख रक्कमाबाबत जनतेला व प्रामणिक व्यक्तीची गैरसोय टाळण्यासाठी आणि तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तीन अधिका-यांची समिती गठित करण्यात आली आहे. तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आचारसंहिता कक्ष, मिडीया सेल, एक खिडकी योजना, टोल फ्री क्रमांक 1950, नामनिर्देशन कक्ष असे विविध कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत.

निवडणूक प्रक्रियेची व आदर्श आचारसंहितेचे कोटेकोर पालन करण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखत पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी सातारा यांनी केले आहे.