‘नवीन महाबळेश्वर’ला विरोधच; प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरणतज्ज्ञांची एकमुखी मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या मे-२०२४ मध्ये सातारा जिल्ह्यातील संवेदनशील पश्चिम घाट परिसरात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान पर्यटन प्रकल्पाची अधिसूचना जाहीर करण्यात आली. केंद्र शासनाने पश्चिम घाटाबाबत जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेमध्ये राज्य सरकारच्या प्रस्तावित गिरिस्थान प्रकल्प रद्द करावा, अशी एकमुखी मागणी पयार्वरणतज्ज्ञांनी केली आहे. आक्षेप नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या प्रकल्पाला विरोध दर्शविणारे हजार ई-मेल पाठविण्यात आले आहेत.

नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा, जावळी, पाटण व महाबळेश्वर या तालुक्यांतील २३५ गावांचा समावेश आहे. यापैकी १४९ गावे केंद्र शासनाच्या अधिसूचनेच्या संवेदनशील यादीतील आहेत. या प्रकल्पाच्या परिसरात कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व कास पुष्प पठार यांचा समावेश आहे.

हा प्रकल्प संरक्षित वनक्षेत्रातील, तसेच कास पठार व कोयना अभयारण्य या नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ परिसरातील आहे. हा प्रकल्प अमलात आणण्यापूर्वी राज्य सरकारने केंद्र शासनाची मंजुरी घेतलेली नाही. पर्यावरण व जैवविविधतेच्या नियम व कायद्यांचे पालन केलेले नाही.