वर्धनगडावरील ‘ते’ अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात हटवले; पहाटेपासून राबविली कारवाईची मोहीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ल्यावरील दर्गा परिसरात असलेले अतिक्रमण आज पहाटेपासून पोलीस प्रशासन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हटवण्यास सुरुवात करण्यात आली. आज पहाटेच्या सुमारास पोलिस व वन विभागचे पथक वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाले. तसेच पोलीस व वनविभागाच्या पथकाकडून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गडाच्या पायथ्यापासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील किल्ले वर्धनगड येथे अतिक्रमण केलेली दर्गा हटवण्याचे काम सोमवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले होते. दरम्यान त्या कामास आज मंगळवारी पहाटेपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. वर्धनगड किल्ल्यावर दर्गा अनधिकृत असल्याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी सातारा जिल्हा प्रशासनाला निवेदन देत ही दर्गा हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन विभाग आणि सातारा पोलीसांच्या बंदोबस्तात ही दर्गा हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वी शिवकालीन असलेला दर्गा काही समाजकंटकांनी काही दिवसापूर्वी ती पाडली होती.

तशा पद्धतीचे निवेदन वर्धनगड ग्रामस्थ व मुस्लिम समाजाकडून जिल्हाधिकारी सातारा यांना कळविण्यात आले होते. त्यानंतर ती दर्गा ग्रामस्थांच्या व मुस्लिम समाजाच्या लोकवर्गणीने बांधण्यात आली होती. परंतु ज्यावेळी बांधकाम करण्यात आले त्यावेळी या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे मनसेचे कार्यकर्ते यांनी वनविभागाला कळवून हे वाढीव अतिक्रमण काढावे अन्यथा हनुमान मंदिराला परवानगी द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यास अनुसरून कागदपत्रानुसार त्या ठिकाणी असलेले कबर सोडून झालेले अतिक्रमण आज पोलीस प्रशासनाच्या मोठ्या पोलीस बंदोबस्तासह वनविभागाच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आले.

या अतिक्रम हटाव कारवाईच्या मोहिमेबाबत पोलीस व वन विभागाच्यावतीने गुप्तता पाळण्यात आली होती. एकूणच संबंधित अतिक्रमण हटववण्याची मागणी वर्धनगड ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्याकडेकेली होती. त्यानुसार आज अतिक्रमण हटावची मोहीम राबविण्यात आले.