कराडला 30 टन निर्माल्य गोळा अन् 3 तासात कृष्णा नदीकाठ चकाचक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । स्वच्छतेमध्ये देशात नाव काढलेल्या कराड पालिकेकडून गणेशोत्सवात देखील आपले काम चांगल्या रीतीने पार पाडले आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने कृष्णा नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. याचसोबत निर्माल्यही सोडले जाते. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करत काल दिवसभरात तब्बल 30 टन इतके निर्माल्य संकलित केले. तसेच त्यानंतर दुसऱ्या दिवशी आज पहाटे पालिका कर्मचाऱ्यांनी कृष्णानदीकाठी दाखल होत नदीकाठी पडलेला कचरा एकत्रित करत स्वच्छता केली. स्वच्छतेच्या बाबतीत काम करणाऱ्या या पालिका कर्मचाऱ्याचे शहरात सध्या चांगलेच कौतुक होत आहे.

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,” असा जयघोष करत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेश मूर्तीं कृष्णा घाटावर आणि जलकुंडात मोठ्या उत्साहात विसर्जित करण्यात आल्या. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपल्या गणेश मूर्ती घेऊन वाजत गाजत विसर्जनस्थळी दाखल होत होत्या. यामध्ये त्यांच्या मदतीसाठी राबत होते पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे हात. स्वच्छता हाच आपला एकमेव धर्म असे मानत पालकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस राबत कृष्णा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हे नकाईचा कौतुकास्पद आहे. शार आणि त्यातील सार्वजनिक पर्यटनस्थळे व प्रत्येक ठिकाण हे आपले घर असल्यासारखे मानत या पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता ठेवली जातेय.

कृष्णा कोयनेच्या नदीपात्रात यंदाच्या वर्षी मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याचे लक्षात घेत पालिकेच्या वतीनेउत्तम रीतीने विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी कृत्रिम जलकुंडाची तसेच निर्माल्यसाठी निर्माल्य कलश व्यवस्था केली गेली होती. शहरात विविध ठिकाणी घरगुती गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक विसर्जन करण्यासाठी जलकुंड ठेवण्यात आले होते. सर्वेक्षण सर्वेक्षण 2024 आणि ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ अंतर्गत कराड नगरपरिषद व एनव्हायरो फ्रेन्डस् नेचर क्लब, कराड यांचे संयुक्त विद्यमाने पर्यावरणपुरक गणेश उत्सव अभियानमध्ये ‘सर्व नागरिकांना सहभाग घ्यावा असे वारंवार आवाहन केले. त्यास कराडकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

कराड शहर तसेच स्वच्छतेची जबाबदारी हि सर्वांचीच : जालिंदर काशीद

कराड शहरात गेल्या अकरा दिवसात स्वच्छता राखण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांसोबत एनव्हायरो फ्रेन्डस् नेचर क्लबच्या वतीने देखील केले आहे.दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाबरोबरच अकरा दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी क्लबच्या वतीने नागरिकांमध्ये जलकुंडात गणेशमूर्ती विसर्जित करणे, निर्माल्य एकत्रित करणे अशी मके करण्यात आली आहि असल्याची माहिती कराड येथील एनव्हायरो फ्रेन्डस् नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ बोलताना दिली.

पालिकेच्या निर्माल्यदानच्या आवाहनास नागरिकांचा प्रतिसाद : रफिक भालदार

कराड पालिकेच्या वतीने नदी प्रदूषण होऊ नये म्ह्णून निर्माल्य कलश शहरातील ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये भाविकांनी तसेच नागरिकांनी निर्माल्य टाकून नदी प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. त्या आवाहनास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असल्याचे पालिकेचे अधिकारी रफिक भालदार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.

Karad News 6

पालिकेकडून विसर्जन मार्गाची धुलाई

काल कराड शहरातील विसर्जनमार्ग असलेल्या दत्त चौक ते चावडी चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात गुलाल तसेच इतर कचरा पडल्याचे लक्षात येत पालिकेच्याकर्मचाऱ्यांकडून मल प्रकल्प येथील पाण्याचा टँकर बोलवण्यात आला. या टँकरमधील पाण्याने रस्त्यावर साचलेला गुलालाचा थर हटवण्यात आला. तसेच ठिकठिकाणी पडलेला कचरा देखील उचलण्यात आला.

Karad News 7

नागरिकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

कृष्णा व कोयना नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी ज्या नागरिकांनी नगरपरिषदेचे कृत्रिम जलकुंडामध्ये आपले गणपती विसर्जन केल्याने त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. जलकुंडामध्ये गणेश भक्तांनी ऐकून 4600 मूर्ती विसर्जित करून पर्यावरणपुरक गणेश उत्सव अभियानमध्ये सहकार्य केले. कराड नगरपरिषदेने ठेवलेल्या निर्माल्य कलश मध्ये ऐकून ३० टन निर्माल्य करण्यात संकलित झाले.

Karad News 8

30 टन निर्माल्यापासून होणार तयार उत्तम दर्जाचे खत

कराड पालिकेकडून घरगुती कचरा एकत्रित करत त्यापासून बारा डबरे परिसरात खत प्रकल्प येथे नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी दररोज हजारो किलो इतक्या क्षमतेने उत्तम प्रतीचे खत तयार केले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कराड पालिकेतर्फे गणेश विसर्जन दिवशी गोळा केलेले तब्बल ३० टन निर्माल्य खत निर्मितीसाठी वापरले जाणार आहे.