गोपनीय दौऱ्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे दरेगावी इमर्जन्सी लॅडिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीचे दिवस असल्याने राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत आहेत. अशात वरिष्ठ नेत्यांचे खासगी दौरे देखील वाढले आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या गावी एक दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यांचा आजचा दौरा हा अत्यंत गोपनीय असा होता. दरम्यान त्यांचे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे व प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा दरेगावी उतरले आहे.

राज्यात घडत असलेल्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा अत्यंत गोपनीय असा होता. दरम्यान, मुख्यमंत्री काल रात्री उशिरा अत्यंत धावपळीत अचानक दरे दौऱ्यावर आले होते. आता पुन्हा ते त्यांचा नियोजित दौरा आटोपून मुंबईकडे प्रयाण करत असताना त्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे पुढे जाऊ शकत नसल्याने ते पुन्हा दरेत उतरले.

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरु असताना मुख्यमंत्री शिंदे अशा महत्वाच्या बैठकांमधून वेळ काढून साताऱ्यात त्यांची दौऱ्यावेळी कोणी कोणी भेट घेतली. निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी नेमकी कुणाशी आणि काय चारचा केली याबाबत मात्र कमालीची गोपनीयता पाळली जात असल्याने याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु झाली आहे.