कराड बाजार समितीच्या सभापतिपदी प्रकाश पाटील यांची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश पाटील सुपणेकर यांना संधी देण्यात आली आहे. विजयकुमार कदम यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची वर्णी लागली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी मोठ्या चुरशीने झाली. बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी खंबीर साथ दिली.

या निवडणुकीसाठी मोठे कष्ट घेतलेले उंडाळकर गटाचे युवा कार्यकर्ते विजयकुमार कदम यांना पहिल्यांदा सभापतिपद देण्यात आले. त्यानंतर सभापती कदम यांनी सर्वांना संधी मिळावी या ठरलेल्या धोरणाप्रमाणे राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा उपनिबंधक यांनी मंजूर केल्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी कार्यवाही सुरू झाली होती. त्यानुसार आज उपनिबंधक यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत सभापतीपदी प्रकाश पाटील यांना सर्वांना मते संधी देण्यात आली.

सभापतीपदाच्या माध्यमांतून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार : प्रकाश पाटील

कराड बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण आणि माजीमंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या विचाराने पुढील वाटचाल करणार असून सभापतीपदाच्या माध्यमातून कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सदस्य, शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेऊ. सभापतीपदी निवड केल्याबद्दल बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाचे आभार मानून यापुढे त्यांना सोबत घेऊन पुढे काम करणार असल्याची प्रतिक्रिया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रकाश पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.