वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला 100 टक्के मतदान करण्याचा संकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने मतदान वाढीसाठी जनजागृती केली जात आहे. दरम्यान, फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथील वृद्धाश्रमात मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध पुरुष व महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची ग्वाही दिली.

जागरूक मतदार लोकशाहीचा आधार, मतदान हा अधिकार नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानासाठी वेळा काढा आपली जबाबदारी पार पाडावी, चला मतदान करुया लोकशाही रुजवुया, 18 वर्षाचे वय केले पार मिळाला मतदानाचा अधिकार, आपले मतदान लोकशाहीचा प्राण, अशा आशयाचे फलक घेऊन वृद्धाश्रमात जनजागृती करण्यात आली.

आई बाबा प्लिज मतदान करा……!

गिरवी ता फलटण येथील विद्यार्थ्यांनी लोकशाही जास्तीत जास्त प्रगल्भ होण्यासाठी आई-बाबांना प्लीज तुम्ही मतदान करा, असे आव्हान स्वतः पत्र लिहून केले. मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक शाळा जिल्हा परिषद गिरवी, तालुका फलटण येथे घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने अत्यंत उत्सुकतेने पत्र लिहिले. भारताची लोकशाही अधिक प्रगल्भ होणे गरजेचे आहे, त्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक जबाबदार भावी नागरिक या नात्याने मतदान करावे अशी नम्र विनंती पत्रा द्वारे करत आहे अशी भावनिक साद चिमुकल्यांनी घातली.