एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्ध ठार; लोणंद बसस्थानकासमोरील घटना

0
139

सातारा प्रतिनिधी | शिरवळ येथील एसटी बसस्थानकासमोर एसटी बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध जागीच ठार झाला. सोपान महादेव रिटे (वय ७५, रा. तरडफ, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद एसटी बसस्थानकासमोर पुणे- सातारा रस्त्यावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोपान महादेव रिटे हे पाय चालत निघाले होते. यावेळी बसस्थानकातून बाहेर आलेल्या पारगाव- खंडाळा आगाराची नीरा-सातारा एसटी बस (एमएच ०७ सी ७०९८) ही सातारा बाजूकडे निघाली होती.

महादेव रिटे या एसटी बसच्या चाकाखाली सापडले. यात ते जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.