सातारा प्रतिनिधी | सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये छत्रपती शिवरायांनी वापरलेल्या नखांसारखी वाघनखे लोकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार, असा टोला मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
साताऱ्यात पार पडलेल्या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विरोधकांना टोला लगावला. सकाळी मोठ्या उत्साहात शासकीय निवासस्थान ते छत्रपती शिवाजी संग्रहालय अशी रॅली काढण्यात आली. ढोल ताशे वाद्यांच्या गजरात आणि मर्दानी खेळांच्या उत्साहात ही रॅली काढण्यात आली. त्यानंतर ज्या ठिकाणी वाघ नखे ठेवण्यात आलेली आहेत. त्या शिवाजी संग्रहालयात ती वाघनखे सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आले आहेत.