वाघनखं योग्यवेळी आलीत त्याचा योग्यवेळी वापर करु, मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वाघनखं आली हा अभिमानाचा दिवस आहे. पण, वाघनखांबद्दल काही लोक शंका उपस्थित करतात हे दुर्दैव आहे. चांगल्या कामाला गालबोट लावण्याचं हे काम आहे. तरीही ही वाघनखं योग्यवेळी आलीत. त्याचा योग्यवेळी वापर करु, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत. बसले तर तोंड उघडूनही सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांना लगावला.

सातारा जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात शिवशस्त्रशौर्यगाथा- शिवकालीन शस्त्र प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लंडनमधून वाघनखं आणून सरकारनं आपला शब्द पाळला. कारण, ही वाघनखं महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दगाबाज अफजलखानाचा कोथळा याच वाघनखानं काढला होता. वाघनखांमुळे सर्वांत आनंद दिसत आहे. पण, यावर शंका घेतली जात आहे. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शाैर्य आणि वीरतेचा अपमान केला जातोय. राज्यातील शिवभक्त हे कदापाही सहन करणार नाहीत.

राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम सरकार करत आहे. महिला, शेतकरी, तरुण, विद्याऱ्थी यांच्यासाठी योजना आणल्या आहेत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, विरोधक पैसे कोठून आणणार म्हणून योजनांवर आक्षेप घेतात. तरीही आम्ही तिघांनी ठरवलं तर काहीही होतं. कारण योजनांचे पैसे वेळच्यावेळी लाभाऱ्श्यांच्या खात्यावर पोहोचतील. कारण आम्हाला वैयक्तीक स्वाऱ्थ नाही. आम्ही देणारे आहोत.

प्रतापगड विकास प्राधीकरण; १५० कोटींची तरतूद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठी घोषणा केली. प्रतापगड विकास प्राधिकारणची खासदार उदयनराजेंच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली असल्याचे सांगत त्याचा अध्यादेश दाखवला. नंतर अध्यादेश खासदार उदयनराजेंकडे देण्यात आला. तसेच यासाठी शासनाने १५० कोटींची तरतूद केल्याचेही जाहीर केले. तर संगम माहुली येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा जीर्णाेध्दारही करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.